श्री संस्थेची अधिकृत शाखा 

श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र आळंदी
श्री क्षेत्र ओंकारेश्वर श्री क्षेत्र गिरडा श्री क्षेत्र पंपासरोवर (कपिलधारा क्षेत्र),नाशिक
 

 ...............................................................................................................................................................................................................................................

श्री संस्थेची अधिकृत शाखा - श्री क्षेत्र आळंदी

विठूभक्तांचे आणखी एक पवित्र स्थान म्हणजे ज्ञानेश्वरांची आळंदी. ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला येणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये आणि भागवत धर्माचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा याकरिता या क्षेत्राची शाखा म्हणून निवड करण्यात आली.

१९९८ साली येथे तीन इमारती बांधून शाखेचे काम सुरू करण्यात आले होते. श्रींच्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे तसेच  अत्यंत कलाकुसरीने युक्त धोलपूरी दगडाच्या प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले आहे. येथे एकूण ४ भक्तनिवास १०५ खोल्या प्राथमीक सोयीयुक्त. सोबतच २०० बेडची पर्यायी निवास व्यवस्था. भक्तनिवासाच्या पलीकडे चढणीवर हे भव्य संगमरवरी मंदिर उभारण्यात आले आहे. राजस्थानहून बोलावलेले खास कारागिरांनी मंदिर उभारणीचे आणि त्यावरील कलाकुसरीचे काम केल आहे. खाली सभामंडप आणि वरच्या बाजूला महाराजांची मूर्ती असे या मंदिराचे स्वरूप आहे. या प्रवचन हॉलमध्येच महाराजांची तसबीर, पादुका दर्शनासाठी ठेवलेल्या आहेत. या प्रवचन हॉलमध्ये भक्तगण नामस्मरण, पारायण करतात.
आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था आहे. आषाढी, कार्तिकीला तसेच उन्हाळ्याच्या आणि नाताळच्या सुट्टीत भाविकांची या क्षेत्री गर्दी असते. 
प्रगटदिन उत्सवाच्या निमित्ताने गोड भात, भाजी, चपाती महाप्रसाद म्हणून दिला जातो. दुपारी तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण झाल्यानंतर येणाऱ्या भक्तांना द्रोणातून गोडभात दिला जातो. यात्रेच्या वेळी नवमीला महाराजांची पालखी आळंदीला येते. यावेळी कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसादाचे वितरण होते. श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा उत्सवाप्रसंगी १,००,००० भाविकांना महाप्रसाद वितरण केल्या जाते. कार्तिकी यात्रेदरम्यान येथील दवाखान्यात चार दिवस विनामूल्य आरोग्य तपासणी आणि उपचार यांची व्यवस्था असते. वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी आळंदीला येतात. येथे त्यांच्या निवासाची व्यवस्था व ५०० विद्याथ्र्यांना माधुकरी वितरण करण्यात येते.

श्री क्षेत्र आळंदी भजनी साहित्य वितरणाविषयी :

श्री गजानन महाराज संस्थान, तर्फे श्री क्षेत्र शेगांव, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी उत्सव- वारी प्रसंगी श्री भागवत धर्म प्रचारार्थ, भजनी साहित्य व संत वाङमयाचे सेवार्थ वितरण करण्यात येते. तसेच कार्तिक वद्य वारीप्रसंगी शाखा श्री क्षेत्र आळंदी येथे भजनी साहित्य व संतवाङमयाचे सेवार्थ वितरण करण्यात येते.

निवास व्यवस्था