श्री संस्थेची अधिकृत शाखा 

श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र आळंदी
श्री क्षेत्र ओंकारेश्वर श्री क्षेत्र गिरडा श्री क्षेत्र पंपासरोवर (कपिलधारा क्षेत्र),नाशिक
 

 ...............................................................................................................................................................................................................................................

श्री संस्थेची अधिकृत शाखा - श्री क्षेत्र गिरडा : 

श्री क्षेत्र कपिलधाराप्रमाणे हे क्षेत्रही निर्जन, शांत आणि दाट वनराईतील. तपसाधनेसाठी उत्तम. त्यामुळे हे ठिकाणही ‘साधना स्थळ‘ म्हणून तयार करण्यात आले आहे. आनंद सागरच्या धर्तीवर येथे ध्यानकेंद्र उभारण्यात येत आहे. विशेषत: सर्व पंथीय साधुसंताना तपसाधना करण्याच्या दृष्टीने हे योग्य ठिकाण आहे. त्यांच्यासाठी सर्व सुविधांनी सज्ज असे तपस्वी निवास उभारण्यात येत आहे. सध्या येथील बांधकाम सुरू असून साधना मंदिर उभारलेले आहे. शिवाय फिरत्या रुग्णालयाचे तपासणी केंद्र आहे. शहरी धावपळीपासून दूर असलेल्या या शांत, रम्य आणि पवित्र जागेला साधना स्थळ म्हणूनच तयार करण्याचे योजलेले आहे. 

श्रीक्षेत्र गिरडा व कपीलधारा येथील शाखांचे कार्य कार्यान्वित झाले आहे. खालील निर्देशित प्रकल्प कार्यान्वित करण्याचा संस्थानचा मानस आहे. सदर प्रकल्प योजना सर्वधर्म, वंश व जातीचा भेदभाव न ठेवता सर्वांसाठी राबविली जाईल.

आयुर्वेदीक व होमिओपॅथीक रिसर्च सेंटर  नॅचरोपॅथी केंद्र  फिरते रूग्णालय
 दवाखाना  इकोटुरीझम सेंटर  खुले रंगमंच  कुटीर उद्योग  हस्तकला
 आध्यात्मीक शिबीरांचे आयोजन  स्मृतिकेंद्र व प्रदर्शनी.

अजठा पर्वताच्या कुशीत ९० एकर क्षेत्रामध्ये अत्यंत निर्जन व वनराईने व्यापलेल्या जागी भाविक भक्तांना शांत चित्ताने व स्थिर मनाने साधना करता यावी, म्हणुन साधना स्थळ तसेच भक्तांना चित्तस्थिरता साधुन ध्यान सुविधेसाठी १ ध्यानकेंद्र, साधनाकुटी व साधक निवास कार्यान्वित करण्याचा संस्थानचा मानस आहे. संस्थानव्दारे स्वामी स्वयंप्रकाश महाराजांचे समाधि स्थळाचा जिर्णोध्दार करून या ठिकाणी भव्य संगमरवरी मंदिर निर्माण करून बाबाजींच्या मुर्तिची शास्त्राधारे संपूर्ण सोपस्कार व यज्ञयागासह प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तसेच पांचिझिरा श्री उंबरेश्वर व एकादश रूद्राचे मंदिराचे परिसराचे नूतनीकरण करण्यांत आलेले आहे. या व्यतिरिक्त आवश्यक सोर्इंनी युक्त तपस्वी निवास निर्मीतीचा मानस आहे.